Breaking News

चारशे पार लक्ष्य गाठण्यासाठी कामाला लागा -माजी आमदार सुरेश लाड

खोपोली ः प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीत चारशे पार जागांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. यासाठी या नूतन पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवावे, घरोघरी जाऊन संपर्क साधावा, असे आवाहन भाजप नेते, माजी आमदार सुरेश लाड यांनी केले. खोपोली भाजपच्या नूतन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
नूतन कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास व्यासपीठावर उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस दीपक बेहेरे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील, कर्जत खालापूर विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे, कर्जतचे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, श्रीकांत पुरी, सनी यादव, आत्करगावचे माजी सरपंच संदीप पाटील, खोपोली शहर अध्यक्ष रमेश रेटरेकर महिला मोर्चा शहर अध्यक्ष शोभा काटे, जिल्हा सरचिटणीस अश्विनी अत्रे, भाजप शहर सरचिटणीस राहुल जाधव, अजय इंगुलकर, युवा मोर्चा अध्यक्ष डॉ. निकेत पाटील, माजी नगरसेवक सूर्यकांत देशमुख, वैद्यकीय सेलचे डॉ. नागरगोजे, माजी शहराध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार सुरेश लाड यांनी या नूतन जनसंपर्क कार्यालयातून सर्वसामान्यांची कामे व्हावी, त्यांना न्याय मिळावा असे सांगून सर्वसामान्यांच्या समस्या छोट्या असतात त्या सोडवल्या, तर त्यांच्या मनात केलेले काम कायम राहते, असे सांगितले. म्हणूनच पक्ष संघटनेसाठी कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त वेळ देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांनीही महिला कार्यकर्त्यांनी पक्षकार्यात अग्रेसर राहावे, पक्ष जी जबाबदारी दिली ती पार पाडण्याचे आवाहन केले. भाजप जिल्हा सरचिटणीस दीपक बेहेरे यांनी लोकसभा निवडणुकीत चारशे पार स्वप्न आपल्याला साकार करण्याचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
प्रारंभिक शहराध्यक्ष रमेश रेटरेकर व पदाधिकार्‍यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रेटरेकर यांनी प्रास्ताविकात भाषणात नूतन कार्यालयाच्या उभारणीबाबत ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे विशेषत: मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर व जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांचे आभार मानले.

दिलेली जबाबदारी पूर्ण करा -जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी

जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी, पक्षाचे काम कार्यकर्त्यांनी योग्यरीतीने करावे व जी जबाबदारी मिळेल ती प्रामाणिकपणे पूर्ण करावी असे सांगून लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्यासाठी सर्वांनी अहोरात्र प्रयत्न करावे. तुमच्यासमोर उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत असे समजून काम करा. आता तयारी केली तर आगामी खोपोली नगरपालिका निवडणुकीत आपली ताकद दिसून येईल. यासाठी सुरेश लाड यांच्या नेतृत्वाखाली पक्ष वाढवण्यासाठी कार्यरत राहा, असे आवाहन केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply