Breaking News

कलावंतांना मानधन देण्याची मागणी

पनवेल : वार्ताहर

मागील दोन वर्षांपासून कोविड 19 या महामारीमुळे भजन, कीर्तन, प्रवचन या माध्यमातून होणार्‍या समाजप्रबोधनाचे साप्ताहिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे वारकरी साहित्य परिषद, पनवेल तालुका, रायगड यांच्यातर्फे कलावंतांना मानधन मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात तसीलदार विजय तळेकर यांना निवेदन देण्यात आले.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या योजनेंतर्गत सांप्रदायिक, कीर्तनकार व सहकारी मंडळी यांना मदत मिळणे जरुरीचे आहे. मात्र कीर्तनकार व सहकारी मंडळी त्यांच्या नावाची प्रसिद्धी नसल्यामुळे वारकरी साहित्य परिषद, महाराष्ट्र या संघटनेचे स्थानिक पदाधिकारी म्हणून पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांना कलावंतांना मानधन मिळणेबाबत निवेदन देण्यात आले. पनवेल तालुक्यातील कीर्तनकार, टाळकरी, विणेकरी, गायक, वादक इत्यादी कलावंत मंडळींच्या नावांची यादी निवेदनासोबत जोडण्यात आली आहे.

Check Also

पनवेल पंचायत समितीची आमसभा

नागरिकांच्या समस्या सोडविण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश पनवेल: रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीची सन 2024-25ची आमसभा शुक्रवारी (दि. …

Leave a Reply