Breaking News

महायुतीचे उमेदवार बारणेंच्या विजयाचा निर्धार

पनवेल प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ; आमदार प्रशांत ठाकूर यांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महायुतीच्या उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी केलेली कामे लोकांपर्यंत जाऊन पोहचवत आहेत तसेच त्यांचे धनुष्यबाण चिन्हही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्याचा महायुतीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.
बुधवारी (दि. 17) पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 20मध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तक्का गावातील जरीमरी मंदिरात जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे यांनी नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. दरम्यान, मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर
यांनी भेट दिली.
या वेळी पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नागसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, प्रभाग अध्यक्ष रघुनाथ बहिरा, युवा नेते प्रतिक बहिरा, राजू बगाटे, शिवसेना उप शहरप्रमुख अर्जुन परदेशी, सागर बहिरा, बबन कांबळे, तौफिक बागवान, गुलाब बागवान, रसूल बागवान, अब्दुल आलम, जरीना शेख,रवींद्र कपाले, बाबासाहेब जगदाळे, महेश राऊळ, अतुल बहिरा, रोशन कोळी, अक्षय भगत, आफताब ताडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पनवेल ग्रामीण भागातही जोरदार प्रचार;
भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ मतदार संघात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना पनवेल विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी गुरुवारी (दि. 18) पनवेल विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील पालेबुद्रुक, कोळवाडी, वलप या गावांमध्ये प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.
भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला. शहराप्रमाणे ग्रामीण भागातही महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे.
प्रचारावेळी माजी पं. स. सदस्य भूपेंद्र पाटील, भाजपचे नेते एकनाथ देशेकर, प्रकाश खैरे, नाथा आगलावे, प्रभाकर पाटील, दीपक उलवेकर, कृष्णा पाटील, बुधाजी मोरावकर, संजोग पाटील, अंकुश पाटील, नवनाथ खुटारकर, जीवन पाटील, जगन्नाथ पाटील, केशव टेंभे, अविनाश उलवेकर, दिलीप पाटील, अशोक उलवेकर, मिलिंद मोरावकर, डॉ. संतोष आगलावे, दगडू आगलावे, सोपान आगलावे, भास्कर आगलावे, जनार्दन आगलावे, जितेश म्हात्रे, दिनकर बारसे यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …

Leave a Reply