Breaking News

महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कर्जत भाजपचा कार्यकर्ता मेळावा

पनवेल : रामप्रहर वृत्त
मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी (दि. 3) सायंकाळी 4 वाजता कर्जत किरवली येथील शेळके मंगल सभागृहात कर्जत विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या वेळी प्रमुख मान्यवर म्हणून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार सुरेश लाड, ज्येष्ठ नेते बाळासाहेब पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आदी उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्यास कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे कर्जत तालुकाध्यक्ष राजेश भगत, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, खोपोली अध्यक्ष रमेश रेटरेकर, विधानसभा निवडणूक प्रमुख किरण ठाकरे यांनी केले आहे.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply