Breaking News

महाडमध्ये महिलेने पोटच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलुन मारले

रायगड : धम्मशील सावंत

महाड़ तालुक्यात एका महिलेने तिच्या सहा मुलांना विहीरीमध्ये ढकलून देवून स्वतःही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली. यात सहाही मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने रायगड़ हादरले आहे.. महिलेला मात्र वाचवण्यात यश आले आहे.

महाड येथील ढालकाठी गावात सदर महिला पती आणि सहा मुलांसह राहत होती. नवरा दारु पिऊन त्रास देत असल्यामुळे कंटाळेल्या या महिलेने आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास धक्कादायक व टोकाचे पाऊल उचलले.

पाच मुली आणि एका मुलाला आधी विहिरीत ढकलून दिले आणि त्यांनतर तिनेदेखील उडी मारली. मात्र याचवेळी जवळच्या आदिवासी बांधवांनी तीला पाहीले आणि विहिरीतून बाहेर काढले आणि वाडीत आणले. यावेळी तीन हकीकत सांगितल्यानंतर सर्वांना धक्का बसला.
महिलेचा जीव वाचला असला तरी सहा लहान मुलांचा नाहक जीव गेला आहे. सदर कुटूंब परराज्यातील असून ते ढालकाठी येथे उदरनिर्वाह करण्यासाठी आल्याचे समजते. दरम्यान, या घटनेमुळे महाडमध्ये खळबळ उडाली आहे.

Check Also

मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले

मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …

Leave a Reply