उरण : वार्ताहर, प्रतिनिधी
उरण तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 29 नवे रुग्ण आढळले आहेत तर 17 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दिवसभरात भेंडखळ(बीपीसीएल एलपीजी) येथील एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये डोंगरी चार, जसखार दोन, जेएनपीटी दोन, हनुमान मंदिर जवळ नवापाडा करंजा दोन, न्हावा शेवा, बोरी, घारापुरी, कुंभारवाडा ओमकार कॉलनी, पागोटे, सोनारी, मोरा कोळीवाडा, पिरकोन, पाणजे, कोटनाका, भवरा, वाणीआळी तेरापंथी हॉलजवळ, 102 डी विंग सिंडीकेट बँकजवळ, दिघोडे, दिघोडे राम मंदिरजवळ, भोईर आळी नवीन शेवा, जासई, नागाव रोड, जासई रेल्वे कॉलनी येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
मुरुड तालुक्यात 11 नवे रुग्ण
मुरुड : मुरूड तालुक्यात शुक्रवारी रुग्णांमध्ये 11ने भर पडली असून एकदरा गावातील एका 30 वर्षीय तरूणांचा या मध्ये मृत्यू झाला आहे. एकूण पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या तब्बल 112 झाली आहे. अजून काही जणांचे नमुने घेतले असून, त्यांचे अहवालाचा रिपोर्ट येणे बाकी आहे.एकदरा गावातील एका 30 वर्षीय युवकाचा मुत्यू झाल्याने राजपुरी गावातील आठ, तर साळाव व उसरोली या गावातील एक कोरोना पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. मुरूड तालुक्यात बांधीतीची संख्या 112 असून त्यामधील 70 रुग्ण बरे झाले आहेत. तर नऊ जणांचा मुत्यू झाला आहे. उर्वरीत कोरोना बाधीत 33 जणांवर उपचार सुरू आहे.
रोहा तालुक्यात 19 कोरोना रुग्ण
रोहे : महादेव सरसंबे
रोहा तालुक्यात शुक्रवारी 19 व्यक्तींचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रोहा तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या 422 झाली आहे. तर आठ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत तालुक्यात 304 व्यक्तीनी कोरोनावर मात केली आहे. तर कोरोनामुळे नऊ व्यक्तींना प्राण गमवावे लागले आहे. रोहा तालुक्यात आता 109 व्यक्ती सक्रीय कोरोना बाधीत आहेत.शुक्रवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये सात शहरात व 12 ग्रामीण भागातील रुग्ण असुन यामध्ये 11 पुरुषांचा व आठ महिलांचा समावेश आहे.
महाडमध्ये 43 नव्या रुग्णांची नोंद
महाड : प्रतिनिधी
महाड मध्ये नव्याने शुक्रवारी 43 रुग्णांची नोंद झाली आहे, तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
आढळलेल्या रुग्णांमध्ये बिरवाडी सहा, खैरट दोन, वेरखोले दोन, तांबटभुवन दोन, नांगलवाडी, आंबेशिवथर, विजया कॉम्प्लेक्स सारस्वत बँक, आकले, कुसगा, धामणे, खरवली, ठालकाठी, निगडे, खुटील, चांभारखिंड, सिक्वेंट, गवाडी, किंजळघर, वलंग, वरंध, काचले, सवाने, बारसगाव, कांबळे तर्फे महाड, ाळवल, खुटील, ढालकाठी, मधली आळी ऋषीकेश बिल्डींग, माझेरी, नांलवाडी, साहीलनगर गंधारपाले, नांगलवाडी, जुई, प्रभातकॉलनी, महाड येथे प्रत्येकी एकाचा यांचा समावेश आहे. शुक्रवारी दोघांचा मृत्यू झाला 11 रुग्ण बरे झाले आहे. आतापर्यंत 131 जन कोरोनावर उपचार घेत असुन महाडमध्ये एकूण 287 रुग्णांची नोंद झाली आहे.
कर्जत तालुक्यात 12 नवे पॉझिटिव्ह
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार
कर्जत तालुक्यात शुक्रवारी कोरोनाचे 12 रुग्ण असून आजपर्यंत कोरोनाचे 396 रुग्ण झाले आहे. त्यामुळे आता कधीही कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या चारशे पार करणार असे वाटू लागले आहे. दिलासादायक असे की, आतापर्यंत 292 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांत कशेळे चार, कर्जत तीन, आंबिवली, धाकटे, दहिवली, वर्णे, मोठे वेणगांव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
पोलादपूरमध्ये चार कामगारांना कोरोना संसर्ग
पोलादपूर : प्रतिनिधी
महाड एमआयडीसीतील सिक्वेंट कंपनीतील पोलादपूरचे चौघे कामगार कोरोना संसर्गित झाल्याची माहिती आयुषचे डॉ. राजेश शिंदे यांनी येथे दिली. शुक्रवारी महाड एमआयडीसीमधील सिक्वेंट कंपनीतील पोलादपूरचे चौघे कामगार कोरोना संसर्गित झाले आहेत. यामध्ये पोलादपूर शहरातील प्रभातनगर पश्चिम येथील एक तरूण, कापडे बुद्रुक येथील दोन तरूण तर रानवडी येथील एक तरूण असे चौघेजण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. यापुर्वी, महाड एमआयडीसीमधील सिक्वेंट कंपनीतील 19 आणि त्यानंतर 38 कामगार कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे दिसून आले आहे. या 38 पैकी चार पोलादपूर तालुक्यातील रोजगारार्थी आहेत. महाड औद्योगिक वसाहतीमधील कारखाने बंद करण्याच्या मागणीमागील वस्तुस्थिती या कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या अनुषंगाने उघड होत आहे.