पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय, रासप, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ खांदा कॉलनीमध्ये बुधवारी (दि. 8) भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर व अभिवक्ता यांच्याशी नमो संवाद साधण्यात आला.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी डॉक्टर व अभिवक्ता यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षांत केलेल्या कामांचा आढावा घेतला. 10 वर्षांपूर्वीचा भारत आणि आताचा भारत यात कितीपटीने विकास झाला असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. यासोबतच डॉक्टरांनी कोरोना काळात केलेल्या कामाचे कौतुक करून एक सुशिक्षित व्यक्ती 10 लोकांना सुशिक्षित करीत असतो, त्याप्रमाणे अभिवक्ता व डॉक्टरांनी इतर नागरिकांना मतदानाचे महत्त्व सांगावेे, असे आवाहन केले.
उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनीही डॉक्टर व अभिवक्ता यांच्याशी संवाद साधला. यानंतर डॉक्टर व अभिवक्ता यांनी त्यांच्यावर होणार्या हल्ल्यासंदर्भात व कामामध्ये उद्भवणार्या प्रमुख समस्या मान्यवरांसमोर मांडल्या.
या नमो संवाद मेळाव्याला भाजप वैद्यकीय सेलचे कोकण विभागीय संयोजक डॉ. राहुल कुलकर्णी, भाजप पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, पनवेलच्या माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, डॉ. गिरीश गुणे, डॉ. रमेश पटेल, डॉ. मनोज जगनीत, माजी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, अॅड. मनोज भुजबळ, अॅड. टेलगे, डॉ. संतोष आगलावे, डॉ. कृष्णा देसाई, डॉ. विशाला वाणी आदी वकिल, डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
खारघरच्या रामशेठ ठाकूर महाविद्यालयाला ’नॅक’ची ए श्रेणी प्राप्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून अभिनंदन पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर …