Breaking News

जेएनपीटी कामगारांचा नियोजित संप स्थगित

उरण : बातमीदार

जेएनपीटी व्यवस्थापनाविरोधात जेएनपीटी कामगार संघटनांनी पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगार संघटनानी दिलेल्या संपाच्या नोटिशीची दखल घेऊन आज जेएनपीटी व्यवस्थापन व पाचही कामगार संघटनांची बैठक बोलविण्यात आली होती.

त्या वेळी सध्याच्या परिस्थितीतीमध्ये कोणताही बदल न करता कामगार संघटनांशी चर्चा करून नोटिसीमधील मागण्यांवर तडजोड घडवून आणावी, असा सल्ला सहाय्यक कामगार आयुक्तांनी जेएनपीटी व्यवस्थापनाला दिला, तसेच कामगार संघटनांनीही संपाचे हत्यार उपसू नये, असे आवाहनही त्यांनी केले. सहाय्यक कामगार आयुक्तांनी यशस्वी चर्चा करून कामगारांच्या हिताबाबत निर्णय दिल्याबद्दल समाधान व्यक्त करीत उद्या मंगळवार दि. 24 मे पासून करण्यात येणारा संप स्थगित करण्याचा निर्णय पाचही कामगार संघटनांनी घेतला असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply