Breaking News

नाकाबंदी, पोलीस कारवाईने नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी

लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खोपोलीतील अनेक रस्ते पोलीस प्रशासनाने बॅरिगेटिंग करून बंद केले आहेत. तर बाजारपेठेकडे जाणार्‍या मुख्य व एकमेव रस्त्यावर पोलिसांकडून दररोज नाकाबंदी करून वाहने तपासणी केली जात आहे. यात लायसन्स नसेल किंवा बाजारात येण्यासाठी योग्य कारण नसेल तर दंडात्मक कारवाई केली जात आहे. या दररोजच्या कारवाईबाबत नागरिक मात्र पुरते हैराण झाले आहेत.

पोलिसांनी लावलेली नाकाबंदी व तपासणी  ओलांडून येथील नागरिकांना खोपोलीतील एकमेव लसीकरण केंद्र, नगरपालिका रुग्णालय, रेल्वे स्थानक, मुख्य बाजारपेठ, विविध दवाखाने, प्रमुख बँका व मुख्य भाजीपाला मार्केटमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणांनी जावे लागत आहे. यात दुचाकी चालकांची संख्या तुलनेने अधिक असते. पोलिसांकडून खास करून दुचाकी चालकांची तपासणी व दंडवसुली सुरू असल्याने, कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांना दंडात्मक  कारवाई बरोबर मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बाबत पोलीस अधिकारी लॉकडाऊनचे कारण सांगून ही  कारवाई सुरूच राहील असे सांगत आहेत. दुसरीकडे  कोरोना, बेरोजगारी, आर्थिक संकट यामुळे आधीच संकटात सापडलेले नागरिक दंड लावून सुरू असलेल्या वसुली मोहीमेबाबत नाराजी व्यक्त करीत आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply