Breaking News

कर्जतचा गड जिंकल्याचा अभिमान -उद्धव ठाकरे

आ. महेंद्र थोरवे यांनी घेतली ‘मातोश्री’वर भेट

कर्जत ः बातमीदार

कर्जत विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे हे पुन्हा सिद्ध झाले असून शिवसैनिकांचा विश्वास संपादन करून विजय मिळविला आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे, असे कौतुक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. कर्जत विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झालेले आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांनी मुंबईत मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. त्या वेळी ते उद्धव ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी कर्जत हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि बालेकिल्ला तीनवेळा कोणीतरी मध्ये तंगड्या टाकत असल्याने हातातून निसटला जात होता. मात्र या वेळी सर्व सुरळीत झाल्यानंतर शिवसैनिक व महायुतीतील मित्रपक्षांनी दाखवलेली हिम्मत वाखाणण्याजोगी असून त्या ठिकाणी कधी नव्हे एवढी मते शिवसेना उमेदवार थोरवे यांना मिळाली आहेत. या विजयाने शिवसैनिक पेटून उठला की काय होते, याचा प्रत्यय या वेळी आला असून आपण कर्जत शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हे सिद्ध करुन दाखविले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी रश्मी ठाकरे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी निवडणूक काळात उमेदवारी मिळवून देण्यापासून ते प्रचार यंत्रणा राबविण्यात आघाडीवर असलेले आणि आमदार थोरवे यांच्या पाठीशी सावलीप्रमाणे उभे असलेले शिवसेना रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील हे उपस्थित होते.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply