Breaking News

मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांबाबत बैठक

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या उपस्थितीत आयुक्तांशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलमधील मच्छी विक्रेत्यांच्या समस्यांसंदर्भात महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयुक्त मंगेश चितळे यांच्यासोबत शुक्रवारी (दि. 5) बैठक झाली. या वेळी नवीन पनवेल येथे मच्छी मार्केटबाबत चर्चा करण्यात आली. नवीन पनवेल येथे वेगवेगळ्या ठिकाणी मच्छी विक्रेत्या मासळी विकण्यासाठी बसतात. त्यांना एका छताखाली बसवण्याच्या हेतूने महापालिकेने पावले उचलावी, अशी मागणी या वेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी आयुक्तांकडे केली तसेच समस्या मांडल्या. या वेळी अभियंता संजय कटेकर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, मच्छी मार्केट अध्यक्ष मनीषा बहिरा, रोहिणी शेळके आदी उपस्थित होते. आयुक्तांनी लवकरच मच्छी विक्रेत्यांसाठी मार्केट बनविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

Check Also

दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार

रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …

Leave a Reply