खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्र अद्याप सुरू झाले नसून, प्रशासनदेखील त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. तालुक्यात दोन दिवसांत हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाने बुधवारी (दि. 17) खालापूर तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे. साधारणपणे शासनाचे भात खरेदी केंद्र 1 ऑक्टोबरला सुरू होतात. परंतु दीड महिना उलटून गेला तरीही अद्याप खालापूर तालुक्यातील भात खरेदी केंद्राला मुहूर्त सापडलेला नाही. निसर्गाच्या लहरीपणातून हाती आलेले पीक बळीराजा कसंबसं सांभाळून आहे, परंतु वेळेत हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू झाले नाही, तर शेतकर्यांचे नुकसान होण्याची भीती असल्याने भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी भाजप पदाधिकारी आणि शेतकर्यांनी बुधवारी खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांची भेट घेतली. या वेळी भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे, किसान मोर्चा जिल्हा अध्यक्ष परशुराम म्हसे, खालापूर तालुका अध्यक्ष निलेश शिंदे, सरचिटणीस शशिकांत मोरे, जिल्हा चिटणीस रमेश पाटील, शहर अध्यक्ष राकेश गव्हाणकर, रमेश पाटील, मनोज मिसाळ, जयवंत पाटील, निलेश पाटील, प्रसाद पाटील, संतोष तांडेल, नामदेव पवार, अशोक पाटील, गजानन कराळे, निवृत्ती रुठे, लवेश कर्णूक, लक्ष्मण जाधव, सुरेश दिसले, राहुल मसणेसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी उपस्थित होते. तालुक्यात दोन दिवसांत हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू करावे, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा या वेळी भाजपने तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला.
खालापूर तालुक्यात दोन दिवसांत हमीभाव भात खरेदी केंद्र सुरू न झाल्यास भारतीय जनता पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करील. -सुनील गोगटे, कोकण संपर्क प्रमुख, भाजप किसान मोर्चा