उरण : वार्ताहर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवा वगळता उरण बाजार पेठ शनिवार व रविवार दोन दिवस बाजार पेठ बंद ठेवण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडून मिनी लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली आहे. त्यातच एक भाग म्हणून अत्यावशक सेवा वगळता बाकी दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने उरण बाजार पेठण्यात आली आहे. या लॉकडाऊनमध्ये नियम मोडणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा पोलिसांकडून सुरू आहे.
उरण शहरात वैष्णवी हॉटेल, राघोबा मंदिर कोट नाका, उरण चारफाटा, चिरनेर, जासई आदी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली एक पोलीस निरीक्षक, सात सहाय्यक पोलीस निरीक्षक 37 कर्मचारी असा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे उरण नगर परिषदचे कर्मचारी राघोबा मंदिर कोट नाका येथे बंदोबस्ता सोबत होते. आजारी व औषधे आणण्याचे काम अशासाठीच नागरिक उरण बाजारपेठेत येत असल्याचे दिसले.