Breaking News

नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
जल जीवन मिशन योजना, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री वयश्री योजनेची आढावा सभा गुरुवारी (दि. 1) पनवेलमधील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात झाली. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या योजनांचा आढावा घेतला. जल जीवन मिशनच्या कामांमधील समस्या लवकरात लवकर दूर करून या योजनेचा नागरिकांना लाभ मिळाला पाहिजे यासाठी उपायहयोजना करा, अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी अधिकार्‍यांना दिल्या.
या सभेला रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर, भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, अंगणवाडी आणि आशा सेविका, महिला बाविकास खात्याचे अधिकारी, गटविकास अधिकारी, विकास प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.
जल जीवन मिशनची कामे लवकरात पूर्ण करून नागरिकांना या योजनेचा फायदा झाला पाहिजे यासाठी अधिकार्‍यांनी समन्वय ठेवून समस्यांवर तोडगा काढावा, अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी अधिकार्‍यांना दिल्या तसेच लाडकी बहीण योजनेच्या कामाचा आढावा घेत जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे याकरिता आशा सेविकांनी चांगले काम करावे. आपले काम जर चांगल्या पद्धतीचे असेल तर श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने आपल्यामधील चांगले काम करणार्‍या पहिल्या पाच आशा सेविकांना तीन हजार, तर 10 आशा सेविकांना 1500 रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले.
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 4 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply