पनवेल : रामप्रहर वृत्त
प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांच्या 12व्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी (दि. 24) जून रोजी सायंकाळी 7 वाजता पनवेल-उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने पनवेलमध्ये जोड भजनी भारूड आयोजित करण्यात आले आहे.
पनवेल शहरातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात (आगरी समाज हॉल) आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, कामगार नेते महेंद्र घरत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वेळी गायक राजेंद्रबुवा जांभुळकर, सुभाष मुकादम व अनिल मुकादम यांचा जोड भजनाचा कार्यक्रम होणार आहे. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पनवेल-उरण आगरी समाज मंडळाचे अध्यक्ष तथा ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील तसेच पदाधिकार्यांनी केले आहे.
Check Also
प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना युवाशक्तीला नवी दिशा देणारी
आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात …
RamPrahar – The Panvel Daily Paper