आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याअंतर्गत स्थायी समिती माजी सभापती मनोहर म्हात्रे आणि धाकटा खांदा रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शाळेतील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे आयोजन धाकटा खांदा येथील पनवेल महापालिकेच्या श्री गणेश विद्या मंदिर प्राथमिक शाळा क्रमांक 6 येथे शनिवारी (दि. 10) करण्यात आले होते. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्येष्ठ नागरिकांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप, दहावी ते बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच श्री गणेश विद्यामंदिर शाळेच्या युट्युब चॅनेल, इंस्टाग्राम अकाउंट आणि फेसबुक पेजचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, शहर अध्यक्ष अनिल भगत, महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्षा राजश्री वावेकर, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, मोतीलाल कोळी, मुख्याध्यापिका सुमन हिलम, ज्योत्स्ना मॅडम, वैभव पाटील, अश्विनी भोईर, काकडे, वैशाली म्हात्रे, कांचन पाटील, शैला कांबळे, रमेश पाटील, रेपाळे, दलाल यांच्यासह शिक्षकवृंद आणि मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या वेळी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.