Breaking News

पनवेलमध्ये महिला सुरक्षितता, सक्षमीकरण आणि सबलीकरणाची शपथ

भाजपकडून जाणीव जागर

पनवेल : रामप्रहर वृत्त
महिलांच्या सुरक्षिततेची, सक्षमीकरणाची आणि सबलीकरणाची शपथ पनवेलमधील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी शनिवारी (दि. 24) जाणीव जागर करतेवेळी घेतली तसेच तसेच महिलांवर अत्याचार करणार्‍या विकृत मनोवृत्तीचा मूक निषेध केला.
पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर शनिवारी जाणीव जागर करण्यात आला. या वेळी भाजपचे शहराध्यक्ष अनिल भगत यांनी, महिलांवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध भाजप नेहमीच आवाज उठवतो आणि महिलांना संरक्षण देण्यात नेहमीच अग्रेसर असल्याचे सांगितले. बदलापूरमध्ये झालेली दुर्दैवी घटना या पुढील काळात घडू नये यासाठी कायदा आणखी कठोर करता येईल का अशा पद्धतीचा विचार शासन करत आहे, मात्र या संवेदनशील विषयाचे विरोधकांकडून राजकारण केले जात असून हे अत्यंत चुकीचे असल्याचे ते म्हणाले तसेच स्त्रियांना सन्मान मिळावा यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन केले.
या वेळी महिला मोर्चाच्या पनवेल शहराध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगरसेवक अजय बहिरा, तेजस कांडपिळे, माजी नगरसेविका नीता माळी, युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अभिषेक भोपी, पनवेल विधानसभा संयोजक रोहित जगताप, शहराध्यक्ष सुमित झुंझारराव, सरचिटणीस गौरव कांडपिळे, प्रितम म्हात्रे, गणेश म्हात्रे, रूपेश नागवेकर, संदीप पाटील, अक्षय सिंग, प्रसाद खंदारे, मयुर आंग्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Check Also

पनवेल शहरातील वाहनतळाचे भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास आता मदत मिळणार असून आमदार …

Leave a Reply