Breaking News

गुढीपाडवा साधेपणाने साजरा करा -राज्यपाल

मुंबई ः प्रतिनिधी

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गुढीपाडवा आणि नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतानाच यंदा आपले राज्य तसेच संपूर्ण देश एका अभूतपूर्व संकटातून जात आहे. शासनातर्फे या संकटाला तोंड देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र नागरिकांच्या संपूर्ण सहकार्याशिवाय हे शक्य नाही. यास्तव शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नागरिकांना केले आहे. गुढीपाडवा आपापल्या घरी अत्यंत साधेपणाने साजरा करावा. घरी राहा आणि सुरक्षित राहा. नववर्ष  सर्वांकरिता सुख, समाधान, आरोग्य व संपन्नता घेऊन येवो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

Check Also

परेश ठाकूर यांची महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड

पनवेलसह रायगडच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानाची बाब पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनची (एमबीए) ८४वी चतुर्वार्षिक …

Leave a Reply