Breaking News

गाव आदर्श होण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे -भाजप नेते अरुणशेठ भगत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
विकासकामांच्या दृष्टिकोनातून गाव आदर्श कसे होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत असलेली विकासकामे, केंद्र आणि राज्य शासनाने नागरिकांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना यांची माहिती सर्वांपर्यंत पोहचवा, असे आवाहन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले. ते आरिवली गावात 58 लाख रुपयांच्या विकासकामांच्या भूमिपूजनावेळी बोलत होते.
उरण आणि पनवेल तालुक्यांमध्ये आमदार महेश बालदी आणि आमदार प्रशांत ठाकूर हे नागरिकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांनी 33 लाख रुपयांचा आमदार निधी, तर आमदार महेश बालदी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 25 लाख रुपयांच्या निधीमधून आरिवली गाव फाटा ते आरिवली गावच्या रस्त्यापर्यंत काँक्रीटीकरण आणि आरसीसी गटार बांधण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 10) झाला.
या कार्यक्रमास भाजपचे तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, भूपेंद्र पाटील, भाताणचे सरपंच तानाजी पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, गुळसुंदे विभागीय अध्यक्ष डॉ. अविनाश गाताडे, माजी उपसरपंच महेंद्र गोजे, अनंता पाटील, जयंत पाटील, पुंडलिक पाटील, प्रकाश पाटील, चंद्रकांत गोजे, गोपाळ राऊत, अरुण पाटील, दीपक ठाकूर, अनिल काठावले, महादेव पाटील, काशिनाथ दाभणे, आत्माराम गोजे, हरिभाऊ पाटील, महादू गोजे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …

Leave a Reply