Monday , June 5 2023
Breaking News

मुरूड शिघ्रे शाळेतील विद्यार्थ्यांना ट्रॉफी रॅकची भेट

मुरूड : प्रतिनिधी

देणगीदार असगरशेठ अली खतीब यांच्याकडून मुरूड तालुक्यातील शिघ्रे केंद्र शाळेला ट्रॉफी रॅक भेट देण्यात आली आहे. तिचे उद्घाटन नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुरूड तालुका व रायगड जिल्हा स्तरावरील अनेक स्पर्धामध्ये  शिघ्रे येथील केंद्र शाळा भाग घेत असते.  त्या स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थ्यांना तसेच शाळेला ट्रॉफी, प्रमाणपत्रे मिळतात. ते ठेवण्यासाठी ग्रामस्थ नथुराम जानू माळी यांच्या प्रयत्नांतून असगर शेठ अली खतीब, मेहबूब असगर खतीब, मकसूद असगर खतीब (रा. मुरुड) यांनी शाळेला ट्रॉफी रॅक भेट दिली आहे. तिच्या उद्घाटन सोहळ्याला खतीब कुटुंबीय, शिघ्रे सरपंच संतोष पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष माळी, उपाध्यक्ष किशोरी गायकर, रवी अदावडे, जानू हंबीर यांच्यासह पालक उपस्थित होते. मुख्याध्यापक शिवप्रसाद रोडगे, सुरेखा बोर्‍हाडे, अमोल चोळके, प्रमोद फुंदे, पल्लवी कोरके व विद्यार्थी यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले.

Check Also

खारघरमध्ये बास्केटबॉल स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खारघर ः प्रतिनिधी खारघर स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने माजी खासदार …

Leave a Reply