Breaking News

नवीन पनवेलमधील पोलिसाला कोरोनाची लागण

पनवेल : नवीन पनवेलमधील एका पोलीस कर्मचार्‍याचा  कोरोना रिपोर्ट सोमवारी (दि. 27) पॉझिटीव्ह आला. पनवेल परिसरातून अत्यावश्यक सेवेसाठी मुंबईला जाणार्‍या कर्मचार्‍यांमुळे कोरोना संसर्ग वाढत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे राज्य शासनाने त्यांच्याबाबत उचित निर्णय घेऊन पनवेलकरांना संसर्गापासून वाचवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या नव्या रुग्णामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 56 झाली आहे, तर पनवेल तालुक्यातील रुग्ण 65 झाले असून, रायगड जिल्ह्यातील आकडा 78वर पोहोचला आहे.  
कोरोनाची लागण झालेला 46 वर्षीय पोलीस कर्मचारी नवीन पनवेल सेक्टर 13 येथे राहाणारा असून, तो मुंबईतील मानखुर्द येथील पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहे. ते रोज पनवेल-मानखुर्द प्रवास करीत होते. त्यांना कामाच्या ठिकाणी किंवा बस प्रवासात संसर्ग झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, पनवेलहुन मुंबईला  अत्यावश्यक सेवेसाठी दररोज जाणार्‍याना मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संसर्ग वाढू नये यासाठी पनवेल आणि उरण येथून मुंबईला जाणार्‍या कर्मचार्‍यांची राहण्याची सोय मुंबईतच करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केली  आहे

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply