पनवेल : रामप्रहर वृत्त
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ पनवेल, साधू वासवानी मिशन पुणे, भारतीय जनता पक्ष, रायगड जिल्हा मेडिकल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि. 22) जयपूर फूट बसविण्याचा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व उपाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
मोफत कृत्रिम हात व पाय अर्थात जयपूर फूटसंदर्भात लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त ऑगस्ट महिन्यात शिबिर झाले होते. या शिबिरात हात, पाय नसलेल्या दिव्यांग व्यक्तींची तपासणी करून त्या अनुषंगाने कृत्रिम हात, पायसाठी मापे घेण्यात आली होती. अशा व्यक्तींना हे कृत्रिम अवयव रविवारी बसविण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 9 वाजता पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात होणार आहे.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …