पनवेल ः रामप्रहर वृत्त
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये शेकापला गळती लागली असून रविवारी (दि. 29) भिंगार ग्रामपंचायत हद्दीतील भेरले येथील शेकाप कार्यकर्त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
भाजपच्या पनवेल तालुका व शहर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, भूपेंद्र पाटील, प्रल्हाद केणी, पळस्पे विभागीय अध्यक्ष अनेश ढवळे, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित जाधव, युवा मोर्चा पळस्पे विभागीय अध्यक्ष योगेश लहाने, कोन अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, भिंगार सरपंच गुलाब वाघमारे, माजी सरपंच व विद्यमान सदस्य सुभाष पाटील, सदस्य सुनील पाटील, माजी सदस्य बंधू मोरे, रामदास वाघमारे, काशिनाथ वाघमारे, मनोहर वाघमारे, सुरेश नाईक, भिंगार अध्यक्ष सचिन गायकवाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर आकर्षित होऊन शेकापच्या विष्णू जाधव, भगवान वाघमारे, राम पवार, निवृत्ती कातकरी, अनंता वाघमारे, सुनील वाघमारे, निवृत्ती वाघमारे, विजय वाघमारे, महेंद्र वाघमारे, लक्ष्मण वाघमारे, रामचंद्र वाघमारे, बळीराम वाघमारे, कैलास वाघमारे, जयराम कातकरी, रमेश वाघमारे, अशोक वाडवे, दयानंद जाधव, अर्जुन वाघमारे, अभिषेक वाघमारे, अविनाश वाघमारे, सुनील कातकरी, ज्ञानेश्वर वाघमारे, गोविंद कातकरी, ऋतिक वाघमारे, गुरूनाथ वाघमारे, प्रकाश वाघमारे, निता जाधव, तारा वाघमारे, सरिता पवार, मनीषा कातकरी, कमळी वाघमारे, निशा वाघमारे, आबा वाघमारे, उज्वला वाघमारे, लता वाघमारे, विमल वाघमारे, शिवा वाघमारे, कुसुम कातकरी, सुगंधा वाघमारे, पिंटी वाडवे, निकिता जाधव, सुमन वाघमारे, रोशनी वाघमारे, रेश्मा वाघमारे, रूपाली वाघमारे, कल्पना वाघमारे, राजेश वाघमारे, रवी वाघमारे, कुंदा वाघमारे, दर्शना वाघमारे, भुरी वाघमारे, दाखली पवार, कल्पना वाघमारे, गंगु कातकरी, मयुर पवार, नितीन वाघमारे, संदीप वाघमारे, शिवाजी मुरकुटे, बळीराम वाघमारे, अविनाश वाघमारे, हिरा वाघमारे, राम वाघमारे, नाजुका वाघमारे, प्रमिला मुरकुटे, अरुणा वाघमारे, भारती वाघमारे, तारा वाघमारे यांनी भाजपचे विकासाचे कमळ हाती घेतले. आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत व इतर मान्यवरांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …