मोहोपाडा ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळाने खालापूर, चौक, मोहोपाडा, रसायनी येथील बर्याच ठिकाणी विद्युत खांबांवर झाडे पडून वीजपुरवठा खंडित झाला. या वेळी आमदार महेश बालदी यांनी त्वरित मोहोपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात एमएसईडीसीएल(मोहपाडा)चे कार्यकारी अभियंता मनोज जगताप, सहाय्यक अभियंता किशोर पाटील यांच्या समवेत शनिवारी तातडीची बैठक घेऊन परिसरात खंडित झालेला वीजपुरवठा लवकर पूर्ववत कसा करता येईल यासंदर्भात चर्चा केली. मनोज जगताप यांनी लवकरच वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी खालापूर ता. सरचिटणीस प्रवीण जांभळे, वासंबे विभाग जिप अध्यक्ष सचिन तांडेल, वासंबे पं. स. अध्यक्ष आकाश जुईकर, युवा मोर्चा कार्यकर्ते जयदत्त भोईर, अमित शाह, मनोज सोमाणी आदी उपस्थित होते.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …