Breaking News

पृथ्वी, संजू चमकले!; भारत ‘अ’ संघाचा न्यूझीलंडवर विजय

लिंकन : वृत्तसंस्था

भारताच्या अ संघाने न्यूझीलंडच्या अ संघावर पुन्हा एकदा विजय मिळवला. दोन्ही संघांमध्ये झालेला पहिला अनौपचारिक वन डे सामना भारताने पाच विकेटस्ने जिंकला. भारताच्या पृथ्वी शॉ याने या सामन्यात फकेबाजी केश्रली. पृथ्वीला यष्टिरक्षक संजू सॅमसनची तोलामोलाची साथ लाभली.

पृथ्वी आणि संजू यांची मंगळवारीच भारताच्या मुख्य संघात निवड करण्यात आली होती. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे पृथ्वीचा भारताच्या वन डे संघात समावेश झाला, तर टी-20मध्ये संजूला संधी देण्यात आली आहे. पृथ्वीची बॅट न्यूझीलंड दौर्‍यावर चांगलीच तळपत आहे. पृथ्वीच्या अशाच फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने आणखी एका दणदणीत विजयाची नोंद केली. पहिल्या अनौपचारिक वन डेत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने फलंदाजी करीत 48.3 षटकांत सर्व बाद 230 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज याने तीन विकेट्स घेतल्या.

231 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 29.3 षटकांत पाच विकेट्सच्या बदल्यात विजय मिळवला. भारताकडून पृथ्वी शॉने सर्वाधिक 48 धावा केल्या. यात तीन षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता, तर संजूने 21 चेंडूंत तीन चौकार व दोन षटकार खेचून 39 धावा केल्या. याशिवाय मयांक अग्रवाल (29), कर्णधार शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (35) आणि विजय शंकर (20*) यांनीही योगदान दिले.

Check Also

पनवेलमध्ये महायुतीकडून जोमाने प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलला विकासाच्या दिशेने नेणारे कर्तृत्वत्वान आमदार प्रशांत ठाकूर चौथ्यांदा या विधानसभा …

Leave a Reply