Breaking News

स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेलमध्ये ‘स्वच्छता रन’ उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
स्वच्छतेसाठी नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. ’स्वच्छता ही सेवा’ मोहीमेंतर्गत बुधवारी (दि.2) महात्मा गांधींच्या जयंतीचे औचित्य साधून पाच किलोमीटरच्या ’स्वच्छता रन’चे आयोजन वडाळा तलाव येथे करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या स्वच्छता रनमध्ये सुमारे साडेतीन हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला. या वेळी उपायुक्त डॉ. वैभव विधाते, सहायक आयुक्त डॉ. रूपाली माने, विभाग प्रमुख अनिल कोकरे, मुख्य आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड, वैद्यकीय अधिकारी, महापालिका अधिकारी, आरोग्य निरीक्षक, कर्मचारी मोठ्या संख्येने
उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, स्वच्छतेसाठी नागरिकांनी एक पाऊल पुढे टाकत स्वत: रस्त्यावर कचरा करणार नाही, इतरांना कचरा करू देणार नाही असे ठरविले तर आपल्या परिसरात कचरा होणार नाही, त्यामुळे आपले शहर स्वच्छ होईल, पर्यायाने शहर सुंदर होईल. यासाठी आपण प्रतिज्ञाबध्द होण्याचा संदेश या वेळी
त्यांनी दिला.
या वेळी स्वच्छता रनमध्ये सहभागी झालेल्या विविध सामाजिक संघटना, विविध महाविद्यालये शाळा यांच्या प्रतिनिधींना स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच सहभागी सर्व नागरिकांना, विद्यार्थ्यांना मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. या वेळी सर्वांनी स्वच्छतेची प्रतिज्ञा घेतली.

सहभागी महाविद्यालये आणि सामाजिक संस्था
सीकेटी कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल, पिल्लिई कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स, पिल्लईचे अभियांत्रिकी महाविद्यालय, केएलई कॉलेज, रामशेठ ठाकूर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सीकेटी विद्यालय नवीन पनवेल, सीकेटी कनिष्ठ महाविद्यालय नवीन पनवेल, टिळक ज्युनियर कॉलेज, नेरूळ, रोटरी क्लब ऑफ पनवेल महानगर, रनथॉन सायकलिंग क्लब, निसर्ग मित्र संस्था.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply