खोपोली : प्रतिनिधी
मराठी भाषा शाळांमध्ये अनिवार्य करतानाच तिचा संबंध भाकरी व अस्मितेशी जोडला जात असून, मराठी भाषा ओठातून नाही तर पोटातून आली पाहिजे, असे मत शिक्षण विभागाचे माजी सहसंचालक रोहिदास पोटे यांनी खोपोलीत व्यक्त केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या खोपोली शाखेने मराठी राजभाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात रोहिदास पोटे बोलत होते. प्रारंभी कोमसाप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर चव्हाण यांनी साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या साहित्याची महती व त्यांचे योगदान या विषयी माहिती दिली. प्रा. एल बी पाटील व माजी नगराध्यक्ष दत्ताजी मसुरकर यांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. कै.भाऊसाहेब कुंटे स्मृतिप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले. रुपाली शिरसाठ (जनता विद्यालय, मोहोपाडा) आणि सविता शेलवले (छत्रपती शाहू महाराज माध्यमिक विद्यालय, खोपोली) यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र घोडके यांनी केले.नगरसेविका माधवी रिठे, जिनी सम्युअल, किशोर पानसरे, अतूल पाटील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण चौधरी यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनार्दन सताणे, डॉ. सुभाष कटकदौंड, विजय घोसाळकर, नरेन्द्र हर्डीकर, प्रकाश राजोपाध्ये, उदय पाटील, अंबादास पाठक, रेखा जगताप, सुप्रिया मेहेंदळे, सुधा इतराज व प्रकाश सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. अनिलकुमार रानडे यांनी आभार मानले.
चित्रकला स्पर्धेचा निकाल मोठ गट इयत्ता (इयत्ता आठवी ते दहावी)
प्रथम क्रमांक- राहूल गोविंद शहा, द्वितीय क्रमांक-मौला इस्माईल शेख, तृतीय क्रमांक- तनिषा सुरेश मौर्या, उत्तेजनार्थ- रिंकी जयवंत कोळी, लहान गट इयत्ता (इयत्ता पाचवी ते सातवी). प्रथम क्रमांक- शर्वरी के. कांबळे, द्वितीय क्रमांक – वेद सुनिल देशमुख, तृतीय क्रमांक – अयुष अजय ओव्हाळ, उत्तेजनार्थ- भावेश हरिभाऊ मुकणे.