Breaking News

भिवपुरी रोड स्थानकातील पादचारी पुलाचे काम स्थगित

कर्जत : बातमीदार

मध्यरेल्वेच्या  भिवपुरी रोड (ता. कर्जत) रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे काम गेल्या काही दिवसापासून बंद आहे. या पादचारी पुलासाठी मध्यरेल्वे प्रशासनाने आतापर्यंत दोनवेळा  मेगा ब्लॉक घेतला होता. दरम्यान, पादचारी पुलाचे काम रखडल्याने प्रवाशांना रूळ ओलांडून जावे लागत आहेत.

  भिवपुरी रोड स्थानकातून प्रवास करणारे प्रवासी हे मुंबई आणि कर्जत अशा दोन एन्डला विभागले गेले आहेत. त्यामुळे पादचारी पूल दोन्ही एन्डला असावेत, अशी मागणी प्रवासी करीत होते. मध्य रेल्वे प्रशासनाने गतवर्षी या ठिकाणी कर्जत एन्डकडे पादचारी पूल बांधण्यास सुरुवात केली होती. या पादचारी पुलाच्या  दोन्ही बाजूला उतरण्यासाठी पायर्‍या बांधून पूर्ण असून, त्या ठिकाणी गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने तब्बल दोनवेळा पॉवर ब्लॉक घेतले होते. तरी देखील पुलाची अनेक कामे, प्रामुख्याने इलेक्ट्रिकची कामे अपूर्ण असून, ती कामे गेली काही दिवस पूर्णपणे ठप्प असल्याची माहिती भिवपुरी रोड रेल्वे प्रवासी संघाने दिली आहे.

प्रवासी संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते गो. रा. चव्हाण यांनी भिवपुरी रोड स्थानकातील पादचारी पुलाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पादचारी पुलाचे काम अपूर्ण असल्याने प्रवासी आजही रूळ ओलांडून स्थानकाबाहेर पडत आहेत, ही बाब रेल्वे प्रशासनने ध्यानात घेतली पाहिजे अशी सूचना चव्हाण यांनी दिली.

Check Also

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ

शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …

Leave a Reply