Breaking News

विराटला गांगुलीचे रेकॉर्ड मोडण्याची संधी

मुंबई : प्रतिनिधी

30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे. सौरव गांगुलीने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये तीन वर्ल्ड कप (1999, 2003, 2007) खेळले. यातल्या 2003 वर्ल्ड कपमध्ये तर गांगुली कर्णधार होता. या वर्ल्ड कपमध्ये भारत फायनलमध्ये पोहोचला, पण ऑस्ट्रेलियाने त्यांचा पराभव केला.

2003 वर्ल्ड कपमध्ये सौरव गांगुलीने तीन शतके केली होती. एका वर्ल्ड कपमध्ये एवढी शतके करणारा गांगुली एकमेव कर्णधार आहे. या वेळी भारतीय टीम विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणार आहे. विराट कोहलीने आतापर्यंत वनडेमध्ये 41 शतके केली आहेत. वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणार्‍या खेळाडूंच्या यादीत विराट दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्यामुळे या वर्ल्ड कपमध्ये विराटला गांगुलीचे रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.

सौरव गांगुलीने त्याच्या वनडे कारकिर्दीत 311 मॅच खेळल्या, यातल्या 21 मॅच वर्ल्ड कपमधल्या आहेत. गांगुलीने वर्ल्ड कपमध्ये 55.88च्या सरासरीने 1006 रन केले.

Check Also

पनवेल विधानसभा क्षेत्रात नमो चषक 2025 भव्य क्रीडा महोत्सव

खारघरमध्ये भव्य क्रिकेट, कळंबोलीत कुस्ती, तर कामोठ्यात व्हॉलीबॉल, रस्सीखेच आणि फुटबॉल स्पर्धा पनवेल : रामप्रहर …

Leave a Reply