Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलणार -नेते शिवदास कांबळे

संविधानाबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल ः आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त
सर्व गटई कामगार महायुतीचे पनवेल विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून त्यांच्या विजयात चर्मकार समाज खारीचा वाटा उचलेल, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस आणि चर्मकार समाजाचे नेते शिवदास कांबळे यांनी दिली. शिवदास कांबळे यांच्या पुढाकाराने चर्मकार समाजातील गटई कामगारांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा दिला. त्या वेळी झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
या बैठकीस भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आणि लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, कामगारनेते व प्रदेश उपाध्यक्ष महेश जाधव, जगदीश ठाकूर, युवक अध्यक्ष श्री. नेरूळकर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष सुनील मोहोड, माजी नगरसेवक सुनील नाईक, श्री. कारंडे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि गटई कामगार उपस्थित होते.
शिवदास कांबळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी सरकार काम करीत आहे. त्या अनुषंगाने विविध योजना प्रत्येक कामगाराला मिळाली पाहिजे यासाठी आपण कायम प्रयत्नशील राहिलो आहोत. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार प्रशांत ठाकूर हे सातत्याने लोकांच्या हिताचे काम करीत असतात. त्यामुळे त्यांना सर्व कामगारांचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी या वेळी अधोरेखित केले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानले. रोहिदास चर्मकार समाज देशभर पसरलेला असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या समाजाचे कौतुक केले आहे. देशाशी एकरूप असलेला या समाजाचा देशाच्या योगदानात वाटा आहे. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मविश्वासाने काम होत आहे. सरकार संविधानाच्या विरोधात आहे असा खोटा प्रचार आणि दिशाभूल करण्याचे काम विरोधक करत असतात, मात्र सर्वप्रथम 26 नोव्हेंबर 2015 हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे संविधान दिन झाला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर घटनेचे शिल्पकार आहेत. त्यांनी दिलेल्या संविधानाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूजा करून लोकशाहीच्या मंदिरात नतमस्तक झाले होते. सोयीनुसार संविधान बदलण्याचे काम काँग्रेस पक्षाने स्वार्थासाठी केले असल्याचे सांगून आमदार प्रशांत ठाकूर पुढे म्हणाले की, पीएम आवास, उज्वला गॅस, शौचालय, मातृवंदन योजना, जलजीवन मिशन, लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण, पीएम किसान, शेतकरी सन्मान, पीक विमा, आरोग्य योजना, अशा अनेक लोकहिताच्या योजना सरकारने राबवल्या आहेत. त्यामुळे लोकांचे काम करणारे हे सरकार पुन्हा येण्यासाठी मला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply