उलवे नोड : रामप्रहर वृत्त
जात-पात-धर्म-पंत न मानता नेहमीच विकसाचे राजकारण करणारे आणि उरणचा सर्वांगिण विकसासाठी कटीबद्ध असलेले आमदार महेश बालदी यांच्या कार्यप्रणावीवर विश्वास ठेऊन शेकाप आणि काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे.
या सर्व प्रवेश कर्त्यांचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पक्षात स्वागत करून तुम्ही जो विश्वास ठेवून भाजपात आला तो सार्थ ठरल्याशिवाय राहणार नाही, असे सांगितले. उलवे नोडमध्ये आमदार महेश बालदी यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला.
या वेळी काँग्रेस पक्षातील वरचे ओवळेचे माजी सरपंच मोहन घरत, किरण मढवी, वहाळमधील सामजिक कार्यकर्ते विकी घरत, उलवेमधील शेकापचे नेते नासीर खान, मंगेश दापोलकर, रूपेश सुरते, समीर सुरते, भागेश सुरते, प्रतीक सुरते, भरत सुरते, प्रतीक सुरते, भरत सुरते, संजय सुरते, लहू सुरते, योगेश सुरते, कल्पेश सुरते, रामदास सुरते, राजेश बेणारे, किरण मढवी, अमर मढवी, जितेंद्र मढवी, उमेश पाटील, प्रवीण मुंबईकर, समीर मढवी, अमित मढवी, रत्नेश मढवी, रतेश मढवी, आकाश मढवी, प्रतीक्षित भोईर, हेमंत पाटील, विश्वनाथ पाटील, सुरज पाटील, ऋषभ पाटील, सौरभ पाटील, रोहन पाटील, मिलींद पाटील, चेतन पाटील, प्रसाद पाटील, सुभाष पाटील, सुरेश पाटील, मेघनाथ पाटील, भानुदास पाटील, प्रदीप दुपारगुंडे, मोहा कोळीवाडामधील शेकापचे महादेव कोळी यांनी भाजपचे विकासाचे कमळ
हाती घेतले.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …