उरण : वार्ताहर
दिघोडे येथील प्रचार रॅलीला मतदारांचा प्रचंड प्रतिसाद लाभला होता. या वेळी कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांनी केलेल्या विकास कामाचा कार्य अहवाल पुस्तिका घरा-घरात मतदारांन पर्यंत पोहचविण्याचे काम केले.
उरणचे कर्तव्य दक्ष आमदार महेश बालदी हे पुन्हा 190 उरण मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी या मतदार संघात 500 कोटींची विकास कामे करेन, असे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात त्यांनी या मतदार संघात साडे पाच हजार कोटी हुन अधिक रकमेची विकास कामे केली आहेत. या विकास कामांच्या जोरावर ते पुन्हा आमदार होतील, असा ठाम विश्वास मतदारांना आहे.
प्रचार रॅलीवेळी गोवा प्रदेश अद्यक्ष समीर मांजरेकर, उरण तालुका भाजप खजिनदार संदीप पाटील, शैलेश गावंड (विंधणे ग्रामपंचायत सदस्य), युवा मोर्चा सरचिटणीस रमेश पाटील, किसान मोर्चा अध्यक्ष पांडुरंग पाटील, माजी सरपंच सौ. सोनिया मयूर घरत, भाजप गाव अध्यक्ष राजेश पाटील, बूथ अध्यक्ष निलेश पाटील, रूपेश कोळी, हरजीवन ठाकूर, समीर ठाकूर, शरद कोळी, राजेंद्र म्हात्रे, नरेश कोळी, बाळकृष्ण पाटील, बामा पाटील, संदीप पाटील, रघुनाथ घरत, जगदीश कोळी, प्रकाश कोळी, गुरुनाथ पाटील, मयूर माळी, अश्विन पाटील, ऋषिकेश ठाकूर, आशीर्वाद कोळी, मिलिंद कोळीसह महिला पदाधिकारी मेघा राजेश पाटील, श्रद्धा म्हात्रे, लक्ष्मी ठाकूर, सुमन कोळी, प्रणाली पाटील, राखी पाटील आदी सह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …