Breaking News

समस्त गुजराती लोहाणा समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन समस्त गुजराती लोहाणा समाजाचे युवा प्रमुख निल पुजारा यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर, गोवा राज्याचे आमदार दयानंद सोपटे, भाजपचे संघटन मंत्री सतीश धोंड, प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस व पनवेल विधानसभा प्रमुख नितीन पाटील, अ‍ॅड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक हरेश केणी, बबन मुकादम, तालुका उपाध्यक्ष एस. के. नाईक, तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी, ज्येष्ठ नेते सी.सी.भगत, कामोठे अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली अध्यक्ष रविनाथ पाटील, अमरीश मोकल, युवा नेते प्रतीक सादरानी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निल पुजारा यांच्याकडे युवकांची फळी आहे, त्यामुळे त्यांच्या प्रवेशाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मताधिक्यात भर पडणार आहे.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply