मोहोपाडा : प्रतिनिधी
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार महेश बालदी यांच्या प्रचारार्थ रविवारी (दि. 10) मोहोपाडा येथील भव्य मैदानावर भव्य सभा झाली. या वेळी बोलताना त्यांनी 2019मध्ये याच व्यासपीठावर मी शिव-समर्थांचा आशीर्वाद घेतला आणि विजयी झालो. त्याबद्दल तुम्हा सर्वांचे सर्वप्रथम आभार मानतो. त्या वेळी पक्ष नसताना अपक्ष म्हणून निवडून आलो. आता तर तुमची साथ मला आहे. यामुळे विजयाचा गुलाल आपलाच असेल, असा विश्वास व्यक्त केला.
या सभेला भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच तथा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष उमाताई मुंढे, चौक ग्रामपंचायतीच्या सरपंच रितू ठोंबरे, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच सुनील माळी, आरपीआयचे महेंद्र धनगावकर, भाजप कामगार सेलचे अनंत पाटील, माजी सरपंच संदीप मुंडे, किरण माळी, विजय मुरकुटे, ताई पवार, उपसरपंच भूषण पारंगे, विभागीय अध्यक्ष सचिन तांडेल, डॉ. अविनाश गाताडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार महेश बालदी आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, या विभागात काम करत असताना कोट्यवधी रुपयांची विकासकामे पाच वर्षात करता आले. पुढील पाच वर्षात याहून अधिक कामे या मतदारसंघासाठी आणणार आहे. सध्या निवडणुकी प्रचारात चालू आहे की आमदार जातीचा आहे का, पण जनता सुज्ञ आहे. 21व्या शतकात कोण जात-पात बघत नाही, तर विकासकामाला महत्त्व देत आहे. त्यामुळे विकास काम पाहूनच जनता जनार्दन मतदान करेल.
माझ्या अगोदर पाच वर्षात अगोदरच्या आमदारांनी सत्तेत असताना विकासकामे केली नाही, ती कामे करून दाखवली. कोन-सावळा रस्त्यासाठी शेकापने फक्त आंदोलन केले, परंतु हे रस्त्याचे काम करण्यात मी यशस्वी झालो. मोहोपाडा येथे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण केले. वासांबे विभागातील नागरिकांसाठी नाना नानी पार्क, तलावांचे सुशोभीकरण करणे, रस्ते आदी कामे करणार आहे. माझ्या मतदारसंघात एकाही आदिवासी बांधवाचे घर कुडाचे राहणार नाही, असेही आमदार महेश बालदी यांनी सांगितले.
Check Also
उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात
उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …