पनवेल : रामप्रहर वृत्त
भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, पीआरपी आणि मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभा निवडणुकीसाठी दिवसेंदिवस विविध संस्था, संघटनांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. आता दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
या संदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाठिंबापत्र सुपूर्द करण्यात आले असून पाठिंबापत्रात म्हटले आहे की, आमच्या संघटनेच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकीत संस्थापक अध्यक्ष बी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनात सर्व पदाधिकारी व सदस्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना बिनशर्त व सक्रिय पाठिंबा जाहीर केलेला आहे. दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेचा प्रत्येक दिव्यांग सदस्य, त्यांचे कुटुंबीय, निराधार तसेच इतर सर्व सदस्य, पदाधिकारीवर्ग आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत.
आदरणीय रामशेठ ठाकूर हे अत्यंत दानशूर व उदार तसेच समाजातील गोरगरीब व दिव्यांग त्याचबरोबर विद्यार्थी, गुणवंत, गरजवंत अशा सर्वांना मदतीचा हात नेहमीच पुढे करणारे लोकनेते आहेत आणि त्यांचा सामाजिक बांधिलकीचा वारसा त्यांचे सुपुत्र आमदार प्रशांत ठाकूर चालवत आहेत. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात प्रदीर्घ अशी यशस्वी व जनहिताची उल्लेखनीय कामगिरी केली आहे. राजकारण व समाजकारण यांचा अनुभव घेत व अभ्यास करीत विधानसभा निवडणुकीत आमदारपदावर यशस्वी गरूड झेप घेऊन पनवेल मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे एक कर्तव्यदक्ष व जनहिताची कामे करण्यात मग्न राहणारा आमदार आम्हाला लाभला हे या मतदारसंघाचे सुदैव आहे.
अत्यंत दांडगा जनसंपर्क व सर्वसामान्य जनतेविषयीची सहानुभूती यामुळे आता सन 2024च्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा आपण फार मोठ्या मताधिक्याने विजयी होणारच याविषयी आम्हा सर्वांना खात्री आहे. नेतृत्वगुण व समाजसेवी व्यक्ती म्हणून या मतदारसंघातील सुजाण जनता आपणास बहूसंखेने विजयी करणार हे निश्चित असून आमच्या दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्थेतर्फे पाठिंबा देत आहोत, असेही या पाठिंबा पत्रात नमूद केले आहे.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …