Breaking News

न्यू इंग्लिश स्कूल व रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय येथे योग शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल, ओवेपेठ येथे 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून अंबिका योग कुटिरच्या सीबीडी केंद्रातर्फे एक दिवसीय योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थी वर्गाला मनःशांती व शरीर स्वास्थ्याचे प्रशिक्षण देण्यात आले. क्रीडा संचालक अजिंक्य भगत व संभाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी योगाचार्य मनोज शर्मा उपस्थित होते. योग प्रशिक्षक पद्मनाभन आणि रंजना गुप्ता यांनी प्रात्यक्षिक दाखवून सर्व आसने, ध्यान व प्राणायान विद्यार्थ्यांकडून करून घेतले. योगशिबिर कार्यक्रमास प्राचार्य कैलास म्हात्रे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 12 वी वाणिज्य शाखेचा अश्विन धुमाळ याने केले. कार्यक्रमास सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख साहेब, आमदार प्रशांत ठाकूर, सचिव डॉ. गडदे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

Check Also

25 एकांकिका राज्यस्तरीय अटल करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तश्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य …

Leave a Reply