Breaking News

राष्ट्रीय सायकल स्पर्धेत अॅरड. गजानन डुकरे प्रथम; कर्जत दिवाणी न्यायालयात सत्कार

कर्जत : बातमीदार

येथील अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी विधी क्षेत्रा व्यतिरिक्त वेगळ्या क्षेत्रात केलेला विक्रम हा न्यायालयासाठी आणि बार असोसिएशनसाठी मोठा सन्मानच आहे, असे गौरवोद्गार कर्जत दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश मनोज तोकले यांनी नुकतेच येथे काढले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या  वर्ल्ड रेकॉर्ड अटेम्प्ट टायगर राईड विथ नॅशनल फ्लॅग या सायकल स्पर्धेत नेरळ येथील अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी 72किमीचे अंतर अवघ्या दोन तास 47 मिनिटांत पूर्ण करून देशात पहिला क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्यांचा अ‍ॅड. राहुल क्रिकेट क्लबच्या वतीने कर्जत दिवाणी न्यायालयातील बार रूममध्ये सत्कार करण्यात आला. त्यावेळी न्या. तोकले बोलत होते. न्या. मनोज तोकले, सहन्यायाधीश श्रीमती डोलारे आणि सरकारी वकील सी. वाय. पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि मानचिन्ह देऊन अ‍ॅड. गजानन डुकरे यांचा गौरव करण्यात आला. अ‍ॅड. तुषार भवारे यांनी प्रास्ताविक केले. अ‍ॅड. सी. वाय. पाटील, अ‍ॅड. राजेंद्र निगुडकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश अहिर यांची या वेळी समयोचित भाषणे झाली. अ‍ॅड. राहुल क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य व कर्जत बार असोसिएशनचे सभासद या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply