Breaking News

नवी मुंबईत भाजपचा भव्य कौटुंबिक मेळावा; मान्यवरांची उपस्थिती

नवी मुंबई : प्रतिनिधी

भाजपचे नवी मुंबई महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई भारतीय जनता पक्ष आणि स्नेहालय महिला सेवा संस्थेच्या वतीने जुईनगर येथील गावदेवी मैदानामध्ये भव्य कौटुंबिक मेळावा भरविण्यात आला होता.  या सोहळ्यास आमदार गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या समवेत माजी महापौर जयवंत सुतार, भाजपचे जिल्हा अध्यक्ष रामचंद्र घरत, भाजपचे नेते, आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जुईनगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास या ब्रीदवाक्यानुसार या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या काळामध्ये महिलावर्ग घरीच होता. त्यांना काही काळ विरंगुळा मिळावा, त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कोरोना काळात जनतेसाठी निस्वार्थ सेवा करणार्‍या कोरोना योद्ध्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जुईनगर परिसरातील गुणवंत विद्यार्थी, उत्कृष्ट काम करणारे महिला बचत गट व ज्येष्ठ नागरिकांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सोहळ्याला महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. महिलांसाठी मनोरंजनपर खेळ घेण्यात आले. यामध्ये विजयी महिलांना बक्षीस स्वरूपात पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले, तर सहभागी झालेल्या महिलांना 300 हून अधिक बक्षिसे देण्यात आली. माजी नगरसेवक काशिनाथ पाटील यांनी जुईनगरमध्ये अनेक विकासकामे केलीत. त्यांच्या माध्यमातून परिसराचा विकास झाला आहे. यापुढेही त्यांच्या माध्यमातून अशीच जनसेवा घडावी, अशा शुभेच्छा आमदार गणेश नाईक आणि आमदार मंदा म्हात्रे यांनी दिल्या.

प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास आहे. जुईनगर परिसर एक कुटुंब आहे. या परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करीत आहोत. काही विकासाची कामे बाकी आहेत. ती सर्व कामे येत्या काही दिवसांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

-काशिनाथ पाटील, माजी नगरसेवक

Check Also

उरणमधील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखोंचा गैरव्यवहार करणार्‍या ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

उरण : प्रतिनिधीउरण तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींमध्ये लाखों रुपयांचा अपहारप्रकरणी ग्रामविकास अधिकारी वैभव पाटील यांच्याविरोधात उरण …

Leave a Reply