31 जुलैपर्यंत निर्बंध लागू राहणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यात ’मिशन बिगिन अगेन’चा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे महिनाभर लॉकडाऊन कायम राहणार असून, सध्या आहे तेच नियम लागू असतील. यात शिथिलता देण्यात आलेली नाही.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. 1 जूनपासून केंद्राची नवी नियमावली आल्यानंतर राज्यात ’मिशन बिगिन अगेन’ सुरू करण्यात आले. त्यात कंटेनमेंट झोन वगळता अन्य भागांत बर्याच प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले. मिशन बिगिन अगेनचा पहिला टप्पा 30 जूनला संपत आहे. त्यामुळेच 1 जुलैपासून पुढे काय, असा प्रश्न सामान्यांना होता. याबाबत आता शासनाकडून स्पष्टता आली आहे.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊले उचलत स्थानिक परिसरात निर्बंध लागू करू शकतात. अनावश्यक गोष्टींना परवानगी नाकारण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे.