Breaking News

भारतीय संविधानामुळे प्रत्येकाला अधिकार -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्त

भारतीय लोकशाहीत भारतीय संविधानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक देशांतील संविधानाचा अभ्यास करून एक परिपूर्ण असे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिले. भारतीय संविधानाने भारताच्या प्रत्येक नागरिकाला अधिकार प्राप्त करून दिले आहेत, तसेच या संविधानामुळेच आपली लोकशाही बळकट झालेली आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. प्रमोद जाधव संपादित साप्ताहिक मतभेदच्या भारताचे संविधान व आपण या विषयावरील नूतन वर्षाभिनंदन या अंकाचे प्रकाशन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्या वेळी ते बोलत होते. या अंकात अतिशय दर्जेदार असे लेख असून, संपादकांनी या लेखकांची मते नागरिकांसमोर पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम या अंकाद्वारे केले आहे असे सांगून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी ‘साप्ताहिक मतभेद’च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय सेवादलाचे सचिव अल्लाउद्दीन शेख यांनी आपले मत मांडताना सांगितले की, भारतीय संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान असून, आपण सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय कष्ट घेऊन घटना लिहिली आहे. या संविधानाने तळागाळातील भारतीयाला आपल्या अधिकारांची जाणीव करुन दिली आहे. संपादक प्रमोद जाधव यांनी प्रास्ताविक केले. अण्णा हजारेप्रणित भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन पनवेल तालुका निमंत्रक नितीन जोशी, सा. पनवेल टाइम्सचे संपादक गणेश कोळी, पत्रकार कुणाल लोंढे, वैभव गायकर, संतोष सुतार, चंद्रकांत शिर्के, सचिन गायकवाड, राज जाधव, अजिंक्य जाधव आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply