Breaking News

मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनी म्हणजे लोकशाहीची विकासगाथा

भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांचे प्रतिपादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

सेवा व समर्पण अभियानांतर्गत जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरील प्रदर्शनीचे आयोजन पनवेलमध्ये करण्यात आले आहे. या प्रदर्शनीला भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांनी रविवारी (दि. 19) भेट दिली. या वेळी त्यांनी ही प्रदर्शनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जीवनी नसून देशाच्या लोकशाहीची विकासगाथा असल्याचे मत व्यक्त केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या सूचनेनुसार 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर 2021 या काळात सेवा व समर्पण अभियान विविध कार्यक्रमांद्वारे साजरे होणार आहे. त्यानुसार जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेता व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा आणि पनवेल भाजपच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व व जीवनावरील आधारित तीन दिवसीय प्रदर्शनीचे ओरियन मॉलमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीला भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अभिनव प्रकाश, कार्यकारिणी सदस्य अरविंद दमानी आणि प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी भेट दिली. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास महाराष्ट्रभरात आपल्या व्याख्यानातून पोहचवणाच्या विवेक परशुराम भोपी यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर, कामोठे शहर युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, युवा नेते हॅप्पी सिंग, सरचिटणीस दिनेश खानावकर, चिन्मय समेळ, जमीर शेख, सचिव अ‍ॅड. ऋषिकेश जोशी, निखिल चव्हाण, सहसंयोजक नूतन पाटील, सुनील राणा, प्रशांत कदम, परेश पाटील, मिहीर देसाई, तेजस जाधव, पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, देवांशु प्रबाळे, चंद्रकांत मंजुळे, आकाश भाटी, अजिंक्य भेटे, सतीश पाटील, किरण जाधव, नवनाथ भोसले, अमित जावरे, प्रवीण कोरडे, ओमकार पाटील, स्वप्नील मुकादम आदींसह युवा मोर्चाचे पदाधिकारी, कर्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply