Breaking News

महाडमध्ये महिलांचा सन्मान

महाड : प्रतिनिधी : महिलांना घरप्रंपच चालवताना तारेवरची कसरत करावी लागत असली, तरी त्यांनी केवळ चूल आणि मूल यात अडकून पडू नये. नोकरी, व्यवसायासह राजकारणातही महिलांनी पदार्पण करावे, असे प्रतिपादन जि. प.च्या माजी सदस्या सुषमा गोगावले यांनी आज येथे केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने येथील ब्राह्मण सभा हॉलमध्ये महाड-पोलादपूर विधानसभा मतदारसंघातील विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळविलेल्या महिलांचा शाल, श्रीफळ आणि प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी सुषमा गोगावले उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत होत्या. दक्षिण रायगड महिला आघाडीप्रमुख अ‍ॅड. अनिता पवार यांनी या वेळी महिलांना कायदेविषयक, तर डॉ. रश्मी शेठ यांनी ‘महिलांचे आरोग्य आणि घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शन केले. पंचायत समिती सभापती सपना मालुसरे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले. जिल्हा परिषद सदस्या निकिता ताठरे, सदस्या ममता गांगण, दीपिका शेलार, शीतल कदम, माजी सभापती दीप्ती फळसकर, अर्चना कुंभार, विन्हेरे विभाग महिला आघाडीप्रमुख प्रतिभा पवार यांच्यासह महिला या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली भुतकर यांनी केले; तर विजया पोटसुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply