Breaking News

मस्को सानयो कंपनीने केले लौजी रेल्वेस्थानक चकाचक

लौजी रेल्वेस्थानक चकाचक

खोपोली : प्रतिनिधी

कर्जत खोपोली रेल्वे मार्गावरील लौजी स्थानकावर शुक्रवारी (दि. 24) अचानक स्वच्छतादूत अवतरले व त्यांनी सर्व रेल्वेस्थानक काही वेळातच चकाचक केले. या मोहिमेचे प्रवाशांनी स्वागत केले आहे.

लौजी स्थानकात मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुधारणा केल्या जात आहेत, पण स्वच्छता कर्मचारी नेमला नसल्याने फलाटांवर रिकाम्या प्लास्टिक बाटल्या, रॅपर, तसेच पालापाचोळा मोठ्या प्रमाणात होता. शुक्रवारी खोपोलीतील मस्को सानयो या स्टील उत्पादन करणार्‍या कंपनीच्या डीएसआर (सामाजिक सेवा) विभागातील कर्मचार्‍यांनी हातात झाडू घेऊन लौजी स्थानकात  स्वच्छता मोहीम राबविली व स्थानक चकाचक केले.

या स्वच्छता मोहिमेत कंपनीच्या डीएसआर विभागाचे विकास गणवीर, नरेंद्र मेघवाल, संदीप रगडे, राहुल भोईर, कुमारी इपसीता  रावत, प्रवीण देशमुख, अविनाश साळुंखे, युसूफ मालदार, शैलेश थरकुडे, सतीश बडगुजर, विश्वास पाटील. महेश भतीजा, सौरभ मुळेकर, व्ही. एस. अनंतन, रमेश सोळंकी, आप्पा जाधव, शेरबहादूर छेत्री यांच्यासह कर्मचार्‍यांनी श्रमदान केले. स्टेशन प्रबंधक अरविंद पाटील यांनीही या अभियानात भाग घेतला. दरम्यान, या अभियानाचे स्वागत करताना प्रवाशांनी स्थानकात कचरा डबे असावेत, तसेच स्वच्छतागृहात पाण्याची व्यवस्था करावी, अशा मागण्या केल्या.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply