कर्जत ः प्रतिनिधी
माथेरानमधील पर्यटन हंगाम लक्षात घेता पर्यटक माथेरानला पहिली पसंती देताना दिसत आहेत. येथे शनिवारी पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्यामुळे येथील एकमेव असलेले वाहनतळ फुल्ल झाले होते.
येथे 600 वाहनक्षमता असलेल्या वाहनतळावर शनिवारी पर्यटकांची संख्या वाढल्याने वन व्यवस्थापन समितीचे एकमेव असलेले वाहनतळ फुल्ल झाले होते. एप्रिल-मे महिन्यात तीन आठवड्यांआधी माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या मंदावली होती. त्यामुळे येथील हॉटेल व्यावसायिक आणि दुकानदार हवालदिल झाले होते, मात्र 25 मे रोजी अचानक पर्यटकांची संख्या वाढल्याने व्यापारीवर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
महिन्याचा चौथा शनिवार आणि त्यातच येथे होत असलेल्या अश्वशर्यतीच्या थरारामुळे पर्यटकांची संख्या वाढल्याचे मत येथील दुकानदारांनी व्यक्त केले. नगरपालिकेने पर्यटकांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे नियोजन केल्यास माथेरानमधील पर्यटकांची संख्या अजून वाढू शकते, असेही त्यांचे मत आहे.
-वन व्यवस्थापन समितीमार्फत येथे वाहनतळ चालवले जाते. एकूण 10 कर्मचारी वाहनतळावर कार्यरत आहेत. येथे येणार्या पर्यटकांच्या गाड्या नियोजनबद्ध पध्दतीने लावल्या
जातात. त्यामुळे या वेळी येथे अधिक गाड्या उभ्या राहू शकल्या आहेत. -योगेश जाधव, अध्यक्ष, वन व्यवस्थापन