Breaking News

कंटेनर उलटून विषारी वायूची गळती

तात्पुरती वाहतूक बंद करून परिस्थिती आटोक्यात

उरण : रामप्रहर वृत्त

धूतुम हायवे रोडवरील आयओटीएल समोर रविवारी (दि. 24) सकाळी एक कंटेनर पलटी झाला. त्यामधून अत्यंत विषारी वायुची गळती होत होती. यामुळे डोळ्यांना तसेच श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. घटनास्थळी सिडको अग्निशमन दलाने धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली.

जेएनपीटी येथून सकाळी कंटेनर केमिकल घेऊन चालला होता. हा ट्रेलर रविवारी सकाळी 8 वाजता धुतूम गावाजवळील आयओटीएल कंपनी समोर आला असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटून तो रस्त्यावर पलटी झाला. पलटी झाल्यानंतर कंटेनर लिकेज होऊन त्यातून केमिकल बाहेर पडू लागले. हे केमिकल विषारी स्वरूपाचे होते. यामुळे डोळे चुरचुरणे व श्वास घेण्यास अवघड जात होते. घटनास्थळी उग्र वास व डोळे चुरचुरू लागल्याने काही काळ वाहतूक बंद केली होती. घटनास्थळी सिडकोच्या अग्निशमन दलाने धाव घेतली. त्यांनी त्वरित रस्त्यावर पसरलेल्या केमिकलवर माती टाकली. त्यानंतर रस्त्यावर आडवा झालेला कंटेनर सरळ केला. यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply