Tuesday , March 28 2023
Breaking News

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी जडेजा संघात

मुंबई : प्रतिनिधी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात होणार्‍या ट्वेन्टी-20 आणि वन डे मालिकेतून भारतीय संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याच्या जागी संघात अष्टपैलू रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे.

दोन ट्वेन्टी-20 आणि पाच वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी निवडलेल्या संघात हार्दिक पांड्याला स्थान देण्यात आले होते, मात्र पाठीच्या दुखण्याने डोके वर काढल्याने त्याला या मालिकेतूनच माघार घ्यावी लागली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने गुरुवारी (दि. 21) याबाबतची घोषणा केली. बीसीसीआयने सुरुवातीला जाहीर केलेल्या संघात रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली नव्हती, परंतु पांड्याच्या माघारीमुळे जडेजाला संधी मिळाली आहे, पण जडेजाचा केवळ वन डे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे.

Check Also

पळस्पे ते इंदापूर मार्ग काँक्रिटीकरणाचे गुरुवारी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्त मुंबई व विशेषत्वाने कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पळस्पे ते इंदापूर महामार्गातील रस्त्याच्या …

Leave a Reply