Breaking News

घणसोलीत रंगली कुस्तीची दंगल

नवी मुंबई : प्रतिनिधी

घणसोलीत पहिल्यांदाच शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने सिम्प्लेक्स येथील मैदानावर कुस्त्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत महाराष्ट्रभरातून 120 पुरुष व 10 महिलांनी सहभाग घेतला.

या कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन मनसेचे नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष गजानन काळे, पैलवान तेजस पाटील व अशोक पाटील यांच्या हस्ते झाले. तुडूंब भरलेल्या मैदानात एकूण 60 कुस्त्या पुरुषांच्या; तर 5 कुस्त्या मुलींच्या झाल्या. यामध्ये प्रथम विजेत्याला 71 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला 61 हजार रु., तृतीय 41  हजार रु., चतुर्थ 31 हजार रु. व पाचव्या क्रमांकाला 21  हजार रु. बक्षीस देण्यात आले; तर सर्वच्या सर्व म्हणजे 10 महिला कुस्तीपटूंना प्रत्येकी तीन हजार रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. बक्षीस वितरण वारणा डेअरीचे विश्वास कोरे, उद्योजक दीपक पाटील व आयोजक गणपत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

महिला व पुरुष कुस्तीगीर कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, सांगली, कोकण व मुंबई आदी परिसरातून आले होते, तसेच सामने पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. सामने यशस्वी होण्यासाठी सतीश केदारे व सामाजिक कार्यकर्ते नितीन नाईक यांनी मेहनत घेतली. सामन्याचे निवेदन पैलवान सुरेश जाधव यांनी केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply