Breaking News

पनवेल येथे शनिवारी भव्य रोजगार मेळावा

पनवेल : प्रतिनिधी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मल्हार रोजगारच्या वतीने शनिवार दि. 08 जून रोजी पनवेलमध्ये ’भव्य रोजगार मेळावा 2019’ आयोजित करण्यात आला आहे.

खांदा कॉलनीमधील सीकेटी महाविद्यालयात सकाळी 9. 30 ते दुपारी 04 वाजेपर्यंत हा मेळावा होणार असून 100 पेक्षा जास्त कंपन्यांचा या मेळाव्यात सहभाग असणार आहे.  शिक्षित-अशिक्षित, दहावी-बारावी उत्तीर्ण-अनुउत्तीर्ण, पदवीधर, अभियंता व इतर अशा शैक्षणिक पात्रतेनुसार हजारो नोकर्‍यांच्या सुवर्णसंधी या मेळाव्याच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उमेदवाराने बायोडाटाच्या सात प्रती, रहिवासी पुरावा (आधारकार्ड ) आणणे आवश्यक असून नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी 9029404666, 9029404777, 9821531547 किंवा 9833998384 या क्रमांकावर संपर्क साधावा, तसेच मेळाव्याचा जास्तीत-जास्त इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply