
पनवेल : वहाळ विभागीय पंचायत समिती युवामोर्चा अध्यक्ष धिरज ओवळेकर यांचा वाढदिवस बुधवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी धिरज ओवळेकर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, अॅड. चेतन केणी, बळीराम ओवळेकर उपस्थित होते.