Breaking News

दुचाकीस्वारांचा जीव टांगणीला, पावसात मोठ्या अपघाताची शक्यता

रसायनी : प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 जुना मुंबई-पुणे रस्त्यावर दांडफाटा ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक रस्ता असून दुचाकी वाहनचालकांचा जीव टांगणीला लागला आहे. याची सूचना देऊन देखील आयआरबी दखल घेताना दिसत नाही.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 म्हणजेच जुना मुंबई-पुणे महामार्गाची देखभाल दुरुस्ती आयआरबीकडे आहे. त्याबदल्यात शेडुंग येथे टोलवसुली नाका आहे. या महामार्गावर दांडफाटा ते खालापूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक रस्ता व वळणे आहेत.दुचाकी वाहनचालक अपघाताने पडल्यास तो सापडणार देखील नाही, अशी ठिकाणे असून देखील त्याच्याकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. याबाबत त्यांना या हमरस्त्यावर भेटल्यावर काही सूचना केली असता त्याची दाद न घेता पुणे येथील मुख्य कार्यालयात लेखी कळविण्याची सूचना करतात व मुख्य कार्यालयातून सूचना आल्यावर काम करण्यात येईल, असे उत्तर मिळते. ज्या ठिकाणी साईडपट्टी नाही तिथे मोठे गट्टू उभे करणे गरजेचे आहे. जे गट्टू रस्त्याखाली गेलेत त्यांना वर उचलून रिफ्लेक्टर बसविणे व रंग लावणे आवश्यक आहे. साईडपट्टी तयार करण्यात यावी.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply